Manasvi Choudhary
दुधी भोपळा अत्यंत गुणकारी भाजी मानली जाते. अनेकांना ही भाजी खायला आवडत नाही.
तुम्हालाही दुधी भोपळ्याची भाजी आवडत नसेल तर तुम्ही घरच्या घरी दुधी भोपळ्याची कुरकुरीत थालीपीठ ही रेसिपी ट्राय करू शकता.
दुधी भोपळ्याचे थालीपीठ बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
दुधी भोपळ्याचे थालीपीठ बनवण्यासाठी दुधी भोपळा, आलं- लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, कोथिंबीर, हळद, मसाला, मीठ, जिरे पावडर, तेल, दही, बेसन, गव्हाचे पीठ, तीळ हे साहित्य एकत्र घ्या.
थालीपीठ बनवण्यासाठी सर्वातआधी भोपळा स्वच्छ धुवून त्याचा बारीक किस करा.
एका परातीत वरील बेसन, गव्हाचे पीठ घ्या त्यात आलं- लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, कोथिंबीर, हळद, मसाला, मीठ, जिरे पावडर सर्व मसाले मिक्स करा.
नंतर हे मिश्रण कणिकेप्रमाणे चांगले मळून घ्या. नंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत
त्यानंतर एका प्लास्टिक पिशवीवर किंवा सुती रूमालावर चपातीप्रमाणे पिठाचा गोळा घ्या. त्यावर थोडे तेल किंवा पाणी लावा. पिठाचा गोळा हाताने थापून किंवा गोल फिरवून मध्यम जाडीचे थालीपीठ थापा.
तयार करा. थालीपीठाच्या मध्यभागी बोटाने लहान छिद्र पाडा आणि गॅसवर गरम तव्यावर तेल किंवा तूपामध्ये थालीपीठ भाजून घ्या.