Manasvi Choudhary
मराठमोळं अस्सल पारंपारिक सौंदर्य म्हणजेच नथ ही डोळ्यासमोर येते. मकरसंक्रातीनिमित्त तुम्हाला देखील असा साजश्रृंगार करायचा असल्यास तुम्ही नथ घाला.
सध्या पारंपारिक नथ डिझाईन्स ते आधुनिक डिझाईनसच्या अनेक नथ ट्रेडिंगमध्ये आहेत.
पारंपारिक मोत्याची नथ ही कायमच ट्रेडिंगमध्ये असते. मधोमध लाल किंवा हिरवा खडा असलेली नथ कोणत्याही साडी लूकवर उठून दिसते.
नथ एम्ब्रॉयडरी पॅटर्न हा लेटेस्ट ट्रेडिंग आहे. यात सोन्याची नथ घालण्याऐवजी, खण साडीच्या पदरावर किंवा ब्लाउजच्या बाहीवर रेशमी धाग्यांनी नथ विणलेली असते.
पुणेरी मोठी नथ ही आकाराने थोडी मोठी आणि वजनदार असते. ही नथ तुमचा चेहरा भरलेला आणि राजेशाही दाखवते.
जर तुमचा चेहरा गोल असेल, तर मोठी आणि लांब नथ निवडा. जर चेहरा लहान असेल, तर नाजूक आणि कमी मोत्यांची नथ सुंदर दिसेल.
खण साडीवर नेहमी ऑक्सिडाइज्ड किंवा सिल्व्हर नथ वापरा, तर पैठणीवर सोन्याची/मोत्याची नथ वापरा.