Manasvi Choudhary
सध्या लग्नसराईचा सिझन सुरू आहे आणि सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. सोन्याच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळते.
लग्नानिमित्त तुम्हीही मंगळसूत्र खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, तुम्ही सोन्यापेक्षा चांदीचे मंगळसूत्र निवडू शकता.
चांदीचे मंगळसूत्र घातल्यानंतर लूक अत्यंत रॉयल दिसतो. तुम्ही हे मंगळसूत्र कोणत्याही साडीवर घालू शकता.
कोल्हापुरी साज हे मंगळसूत्र पारंपारिक डिझाईनचे असते. हिरव्या, पिवळ्या रंगाच्या पैठणी, काठपदरी साडीवर हे मंगळसूत्र उठून दिसते.
ऑक्सिडाईज्ड मंगळसूत्र हे कायमच ट्रेंडमध्ये असते. स्वस्त आणि हलके मंगळसूत्रामध्ये अनेक डिझाईन्स असतात. कॉटन आणि हँडलूकम साड्यांवर तुम्ही हे मंगळसूत्र घालू शकता.
चांदीच्या चैनमध्ये सोलिटेअर डायमंड स्टाईल पेंडट असते ज्या अमेरिकन डायमंड असे देखील म्हणतात. हे मंगळसूत्र नाजूक असते तुम्ही ऑफिसवेअर करू शकता.
चांदीच्या वाटीचे मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता. पारंपारिक डिझाईनमध्ये सोन्यासारखे हे मंगळसूत्र असते. महिला रोजच्या वापरासाठी हे मंगळसूत्र घालू शकतात.
इन्फिनिटी आणि हार्टशेपचे मंगळसूत्र महिलांना अधिक आवडते. जीन्स टॉप आणि वेस्टर्न लूकवर घालण्यासाठी हे मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता.