Manasvi Choudhary
लग्नानंतरची पहिली संक्रांत ही प्रत्येक मुलीसाठी खास असते. नववर्षातील या पहिल्या सणाला महिला साजश्रृंगार करतात.
मकर संक्रांतीनिमित्त पतीने पत्नीला दिलेली भेटवस्तू ही अत्यंत खास असते. तुम्हाला देखील तुमच्या लाडक्या बायकोला खूश करायचे असल्यास तुम्ही भेटवस्तू द्या.
पहिल्या संक्रांतीला तुम्ही दागिना देणे शुभ मानले जाते. रोज वापरण्यासाठी तुम्ही नाजूक मंगळसूत्र घेऊ शकता.
संक्रांतीला काळी साडी नेसण्याची प्रथा आहे. तिला एखादी पारंपरिक मराठमोळी पैठणी किंवा सध्या फॅशनमध्ये असलेली रेशमी खण साडी भेट द्या
पहिल्या संक्रांतीला तिच्या आवडीनुसार बनवलेले कस्टमाइज्ड दागिने देऊ शकता तुमची आवड तिला आवडेल.
तुमच्या लग्नापासून ते आजपर्यंतच्या सुंदर क्षणांची एक कॅन्व्हास फोटो फ्रेम द्या ज्यामुळे तुमच्या नात्यातील गोडवा आणखी वाढेल.
तुम्ही पत्नीला खास स्मार्टवॉच भेटवस्तू म्हणून देऊ शकता हे देखील तुम्हाला आवडेल.