Siddhi Hande
दररोज गृहिणी, ऑफिसला जाणाऱ्या महिला वेगवेगळ्या साड्या नेसतात. या साड्यांवर मॅचिंग ब्लाउज शिवणे शक्य होत नाही. अशावेळी तुम्ही प्रिंटेंड ब्लाउज घालू शकतात. हे ब्लाउज सर्व साड्यांवर शोभून दिसतात.
सध्या कॉन्ट्रास्ट आणि कॉटनच्या प्रिंटेड ब्लाउजचा ट्रेंड सुरु आहे. हे ब्लाउज कोणत्याही साडीवर मॅचिंग होतात. कॉटन, काठपदर ते डिझाइनर सर्व साड्यांवर हा ब्लाउज तुम्ही घालू शकतात.
तुम्ही प्लेन साडीवर कोणताही कॉन्ट्रास्ट प्रिंटेंड ब्लाउज घालू शकतात. या ब्लाउजवर बारीक डिझाइन असल्यावर सुंदर वाटते.
अनेकजण हँड पेंटेंड ब्लाउज घालतात. यामध्ये ब्लाउजवर हाताने रंगकाम करुन डिझाइन काढलेली असते.
कॉटनच्या ब्लाउजवर जर वेगवेगळ्या रंगाची प्लॉवर डिझाइन असेल तर सुंदर दिसते. हे तुम्ही कोणत्याही प्लेन साडीवर घालू शकतात.
तुम्ही प्लेन साडी आणि डिझाइन असलेला सेम रंगाचा ब्लाउज ट्राय करु शकतात. हे कॉम्बिनेशनदेखील सुंदर दिसते. यावर गोल्डन किंवा सिलव्हर रंगाची डिझाइन असल्यावर अजूनच छान दिसते.
सध्या ब्लाउजमध्येही वेगवेगळे पॅटर्न आहेत. यामध्ये एक नवीन पॅटर्न आलं आहे. त्यामुळे ब्लाउजला वन स्ट्रीप असते आणि बाजूला नेहमीसारख्या स्लिव्ह्स असतात. सध्या या वन स्ट्रीप ब्लाउजचा ट्रेंड आहे.