Manasvi Choudhary
सण-समारंभ आणि पारंपरिक उत्सवांमध्ये हातामध्ये सोन्याच्या बांगड्या असणे म्हणजे सौंदर्य आणखीणच खुलून येतं.
आजकाल महिलांना खूप जड ब्रेसलेट किंवा बांगड्या घालायला आवडत नाही, त्याऐवजी हलक्या आणि ट्रेंडी डिझाईन्सच्या सोन्याच्या बांगड्या निवडतात. त्या डिझाईन्स कोणत्या ते पााहा.
चांदण्या किंवा फुलांच्या बारीक नक्षी असलेल्या ब्रेसलेट स्टाईलच्या सोन्याच्या बांगड्या सध्या खूप फॅशनमध्ये आहेत. तुम्ही या बांगड्या सिंगल किंवा इतर बांगड्यांच्या सेटमध्येही घालू शकता, ज्यामुळे हाताला एक मॉडिश लूक मिळतो.
जर तुम्हाला युनिक डिझाईन हवी असेल, तर तुम्ही जाळीदार नक्षीकाम केलेल्या सोन्याच्या बांगड्यांची निवड करू शकता. या प्रकारच्या बांगड्यांवर सुंदर खडे जडवलेले असतात किंवा बारीक जाळीचे काम केलेले असते, जे दिसायला अतिशय रिच वाटतात.
रोजच्या वापरासाठी किंवा साध्या लूकसाठी पातळ आणि क्लासी सोन्याच्या बांगड्या उत्तम पर्याय आहेत. इतर मोठ्या बांगड्यांच्या किंवा पाटल्यांच्या मध्ये घालण्यासाठी या बांगड्या हातावर खूप सुंदर दिसतात.
बुटी डिझाईन्सच्या बांगड्यांच्या काठावर उठावदार आणि पारंपरिक नक्षी काढलेली असते. चार बांगड्यांचा हा सेट तुम्ही कोणत्याही पारंपरिक पोशाखावर किंवा साडीवर अगदी सहज कॅरी करू शकता.
मॉडर्न आणि ट्रेडिशनल डिझाईनचे परिपूर्ण मिश्रण म्हणजे कटवर्क बांगड्या. यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्सचे कटिंग केलेले असते, ज्याची बॉर्डर अतिशय आकर्षक दिसते आणि हाताची शोभा वाढवते