Manasvi Choudhary
केसांना गजरा लावणे हा मराठमोळा साजश्रृंगार आहे. महिला सण- उत्सवानिमित्त केसांत गजरा माळतात.
खण साडी किंवा पैठणीवर माळलेला पांढराशुभ्र मोगऱ्याचा गजरा तुमच्या सौंदर्याला चार चाँद लावतो
केसांत गजरा माळणाच्या या युनिक हेअरस्टाईल्स तुम्ही नक्की ट्राय करा.
केसांचा गोलाकार आंबाडा घालून त्याभोवती गजऱ्याच्या दोन ते तीन फेऱ्या गुंडाळणे जे साडीवर उठून दिसते.
केस मोकळे सोडून किंवा अर्धवट बांधून त्यावर गजरा 'V' आकारात लावणे. हे दिसायला खूप आधुनिक आणि स्टायलिश वाटते.
लांब वेणी घातली असेल, तर गजरा वेणीच्या वरच्या बाजूला न लावता वेणीच्या मधून किंवा खालपर्यंत नागमोडी पद्धतीने गुंडाळा
जर तुम्ही केस एका बाजूला सोडले असतील, तर कानाच्या मागे फक्त एका बाजूने गजरा पिन करणे. हे वेस्टर्न आणि फ्यूजन ड्रेसवर खूप छान दिसते.