Manasvi Choudhary
मकर संक्रांतनिमित्त तुम्ही गुळाचे विविध पदार्थ बनवू शकता. गुळाची पोळी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
गुळपोळी लाटताना गुळ बाहेर येते यामुळे पोळ्या कडक होतात अशावेळी काय करायचे ते जाणून घ्या.
गुळाची पोळी बनवण्यासाठी गूळ, तिळकूट, बेसन, खसखस पावडर, वेलची जायफळ पावडर, गव्हाचे पीठ, मैदा, मीठ हे साहित्य एकत्र करा.
सर्वात पहिले एका परातीमध्ये गव्हाचे पीठात मीठ आणि तेल हे पीठ भिजवून घ्या. कणिक चपातीप्रमाणे मऊ करा. यानंतर हे तयार पीठ झाकून ठेवा.
पोळीचे सारण बनवण्यासाठी किसलेला गूळ, तिळकूट, वेलची पावडर आणि खसखस हे मिश्रण एकत्र करा. या मिश्रणात भाजलेले बेसन मिक्स करा.
सारणमध्ये बेसन मिक्स केल्यास बेसन गुळातील ओलावा शोषून घेते ज्यामुळे पोळी लाटताना गूळ विरघळून बाहेर येत नाही. संपूर्ण मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
पिठाचा छोटा गोळा करून त्याची पारी करा त्यात तयार गुळाचे सारण भरून कणिक पोळीप्रमाणे लाटून घ्या.
गॅसवर तव्यावर पोळी दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या पोळी भाजताना त्यात तूप सोडा म्हणजे ती मऊ राहते.