Manasvi Choudhary
सध्या पॅडेड ब्लाऊजची फॅशन ट्रेडिंगमध्ये आहे. स्टायलिश लूकसाठी साडी किंवा लेहेंग्यावर पॅडेड ब्लाऊज लूक केला जातो.
डिझायनर साड्या, बॅकलेस गळे आणि ट्रान्सपरंट फॅब्रिकसाठी पॅडेड ब्लाऊजला पसंती दिली जात आहे.
पॅडेड ब्लाऊजमधील सर्वात ट्रेडिंग पॅटर्न म्हणजे प्रिन्सेस कंट पॅडेड ब्लाऊज. यामध्ये ब्लाऊजला समोरून कोणतीही 'टक्स नसतात
वेस्टर्न गाऊनप्रमाणे दिसणारा हा पॅटर्न लेहंगा आणि मॉडर्न साड्यांवर खूप ट्रेडिंग आहे.
स्वीटहार्ट नेक ब्लाऊज पॅटर्न स्टायलिश आहे. 'हृदयाच्या' आकाराचा हा पॅटर्न पॅडेड ब्लाऊजमध्ये हा खूप उठावदार दिसतो, विशेषतः सिल्क आणि नेटच्या साड्यांवर हा पॅटर्न तुम्ही ट्राय करू शकता.
जर तुम्हाला पाठीवर मोठा गळा किंवा पूर्ण बॅकलेस हवा असेल, तर पॅडेड ब्लाऊज विथ नॉट असा पॅटर्न तुम्ही निवडू शकता.
अत्यंत खोलवर असणाऱ्या 'V' किंवा 'U' आकाराच्या गळ्यांसाठी प्लंजिंग नेक पॅटर्न तुम्ही निवडू शकता.