Manasvi Choudhary
दागिन्यांच्या फॅशनमध्ये नेक चेन डिझाईन्स सध्या ट्रेडिंगमध्ये आहे. जड नेकलेसऐवजी नाजूक, डेलिकेट चैनला मुलींची पसंती आहे.
नेक चेन डिझाईन्समध्ये अनेक पॅटर्न आहेत जे तुम्ही साडी, ड्रेस आणि वेस्टर्न आऊटफिट्सवर परफेक्ट दिसतील.
लेअर्ड चेन म्हणजेच दोन ते तीन चेन एकत्र घालण्याचा ट्रेंड सध्या आहे. एक चैन गळ्यालगत असते. दुसरी थोडी लांब असते आणि त्यामध्ये छोटे पेडंट्स असतात.
पेपरक्लिप चेन हे पेपरक्लिपसारखे लांबट असतात हे चेन पॅटर्न आधुनिक आणि मिनिमलिस्टिक आहे. ऑफिस आणि कॅज्युअल वेअरसाठी हे बेस्ट पर्याय आहे.
स्वत:चे नाव असलेल्या चेन तुम्ही निवडू शकता. पर्सनलाईज्ड गिफ्ट म्हणून हे तुम्ही भेट देखील देऊ शकता.
साप साखळी चेन गुळगुळीत आणि लवचिक असतात. या चेन चकाकी टिश्यू सिल्क साडी आणि कॉटन साड्यावर देखील घालू शकता.
सोन्याच्या चेनऐवजी मध्येच छोटे मोती लावलेल्या चेन पारंपरिक साड्यांवर एक 'रॉयल' लूक देतात.