Manasvi Choudhary
तन्मणी मंगळसूत्र हा महाराष्ट्राचा लोकप्रिय पारंपारिक दागिना आहे. तन्मणी मंगळसूत्राची फॅशन कधीच जुनी होत नाही.
तन्मणी मंगळसूत्राचे लेटेस्ट डिझाईन्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
क्लासिक मोत्यांचा तन्मणी मंगळसूत्रात मध्यभागी तीन किंवा पाच मोत्यांच्या पेंडंटचे डिझाईन असते. ही डिझाईन्स अस्सल महाराष्ट्रीयन लूक देते.
पेंडंटचा आकार नथीसारखा किंवा अर्धचंद्राकृती असतो. ज्यावर लाल किंवा हिरव्या खड्यांचे काम असते. हे मंगळसूत्र काठपदरी साडीवर उठून दिसते.
पूर्वी तन्मणी लांब असायचे, पण आता ते 'चोकर मध्ये सुद्धा डिझाईन केले आहे.
मल्टी-लेयर्ड तन्मणी मंगळसूत्रात काळ्या मण्यांच्या २-३ ओळी असतात आणि शेवटी मोठे जड तन्मणी पेंडंट असते.
आधुनिक तरुणींना सोन्यापेक्षा चांदीची डिझाईन अधिक आवडते. यासाठी 'ब्लॅक पॉलिश' तन्मणी ज्वेलरी तुम्ही वापरू शकता. या कॉटन साड्यावर उठून दिसतात