Manasvi Choudhary
साडी सौंदर्यात भर घालते ती म्हणजे ब्लाऊजची स्टाईल. तुम्ही साडीवर कोणत्या स्टाईलमध्ये ब्लाऊज पॅटर्न करता हे महत्वाचे असते.
ब्लाऊज स्टाईलमध्ये व्ही नेक ब्लाऊज पॅटर्न हा सध्या प्रचंड ट्रेंडमध्ये आहे. अनेक महिला व मुली व्ही नेक ब्लाऊज परिधान करतात.
इंडो - वेस्टर्न ब्लाऊजमध्ये कॉलर पॅटर्न असते. तसेच गळ्याला आणि हाताला फ्रिल असतात. यात आजकाल प्रसिद्ध असलेली ऑफ शोल्डर पॅटर्न देखील आहे.
इंडो - वेस्टर्न ब्लाउज पॅटर्नमध्ये जॅकेट ब्लाउज हा एक भन्नाट प्रकार आहे. यात साडीला सूट होणारे जॅकेट तुम्ही घाला. यामुळे तुम्ही रुबाबदार दिसाल.
जर साडीला मोठी बॉर्डर असेल, तर ब्लाउजच्या 'V' आकारावर तशीच जरीची किंवा मण्यांची बॉर्डर लावू शकता.
केवळ समोरच नाही, तर पाठीमागेही 'V' शेपमध्ये तुम्ही ब्लाऊज स्टाईल करू शकता.
ब्लाउजच्या गळ्याच्या कडेने हाताने केलेले नक्षीकाम किंवा आरशांचे काम सध्या लग्नसराईत खूप चर्चेत आहे.