Saam Tv
सध्याच्या जीवनशैलीमध्ये परफ्यूम हा अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे.
१९२१ मध्ये जॅक्स गुरलेन यांनी एक सुंगध तयार केला आणि तेव्हापासून जगभरात हे परफ्युम प्रसिद्ध झाले.
हे प्रसिद्ध परफ्युम भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात प्रसिद्ध आहे.
तर या सुगंधित परफ्युमचे नाव 'शालिमार परफ्युम' आहे.
हे सुगंधित परफ्युम एका सुंदर बॉटलमध्ये विकत मिळतं. याचा वापर तरूण मंडळी जास्त प्रमाणात करतात.
'शालिमार परफ्युम' ला पेटीट रोब नोइरे' नंतर दुसऱ्या क्रमांकावर विकले जाणारे अत्तर आहे. प्रत्येक तासाला १०८ परफ्युमच्या बाटल्या विकल्या जातात.
परफ्युम बनवण्याची प्रेरणा मुघल बेगम मुमताज महल पासून आली आहे.
शाहजहानने आपल्या पत्नीसाठी शालीमार बाग आणि ताजमहाल बांधला.
जेव्हा हे प्रेमप्रकरण जॅक गेरलेनपर्यंत पोहोचले तेव्हा त्याने एका राणीसाठी परफ्युम तयार करण्याचा निर्णय घेतला.