Saam Tv
राज्यात होर्डिंग अपघाताच्या घटना वाढताना दिसत आहेत.
सध्या पावसाने जवळपास सगळ्याच शहरांमध्ये हजेरी लावली आहे.
पुण्यातही मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे.
नुकताच सुरु झालेल्या पावसात एक अपघात घडला आहे.
पुण्यातील अहिल्यानगर रस्त्यावर वाघोळी जवळील सणसवाडी येथे होर्डिंग कोसळले.
पुण्याच्या घटनेत सात ते आठ दुकाची स्वार होर्डिंग्स खाली अडकल्याची बातमी सुत्रांच्या हाती लागली आहे.
सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झालेली नाही.
अचानक होणाऱ्या अवकाळी पावसात नागरिकांची चांगलीच तारांबळ उडालेली आपल्याला पाहायला मिळते.