Manasvi Choudhary
गरबा लूकसाठी तुम्हालाही हटके हेअरस्टाईल करायची आहे तर तुम्ही स्टायलिश हेअरस्टाईल करू शकता.
हटके ड्रेसिंग स्टाईल आणि केसांच्या लांबीनुसार तुम्ही हेअरस्टाईल निवडू शकता.
तरूण मुलींसाठी या सुंदर हेअरस्टाईल सध्या ट्रेंडमध्ये आहेत. फंकी आणि ट्रेडिशनल असा दोन्ही लूक तुम्हाला यामध्ये दिसून येईल. स्कर्ट, जीन्स आणि लेहेंगा यावर तुम्ही ही स्टाईल करू शकता.
गरब्यासाठी खास तुम्ही ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी केसांसाठी निवडू शकता. तुम्हाला जर मोकळे केस ठेवायचे असतील तर हे दागिने निवडा.
गरब्यासाठी लेहेंगा आणि चनिया चोलीवर तुम्ही सुंदर कलरफुल रिबन निवडा त्यावर रंगीबेरंगी गोंडे असतील यामुळे तुमचा लूक स्टायलिश दिसेल.
तुम्ही सूट किंवा इंडोवेस्टर्न लूक केला असेल तर त्यावर तुम्ही हेअरबँड्स ट्राय करा कवडीचे किंवा पेडंट असलेले हेअरबँड्स सुंदर दिसतात.
लहान केसांवर तुम्ही केस अर्धे टाय करून अॅक्सेसरीज लावू शकता. तुमचा लूक भारी दिसेल.