Manasvi Choudhary
भारतीय संस्कृतीत मंगळसूत्राला विशेष महत्व आहे. लग्नानंतर महिला गळ्यात मंगळसूत्र घालतात. सध्या बाजारात मंगळसूत्राच्या एकापेक्षा एक युनिक डिझाईन्स पाहायला मिळतात
सध्याच्या फॅशनमध्ये स्टर्लिंग सिल्व्हर आणि डायमंड-लुक मंगळसूत्रांना महिलांची पसंती मिळत आहे.
तुम्ही देखील नवीन मंगळसूत्र घेण्याचा विचार करत असाल तर लेटेस्ट पॅटर्न्स पाहून घ्या.
सिल्वर रिमझिम ड्रॉप मंगळसूत्रामध्ये छोटे-छोटे डायमंड किंवा सिल्वर ड्रॉप्स असतात. जेव्हा तुम्ही हालचाल करता, तेव्हा हे ड्रॉप्स हलतात, ज्यामुळे त्याला एक 'रिमझिम' लूक मिळतो.
पालमोनास हे मंगळसूत्र सध्या ट्रेंडमध्ये आहे. शुद्ध 925 स्टर्लिंग सिल्व्हरपासून बनलेले हे मंगळसूत्र १८-कॅरेट गोल्ड प्लेटिंग असते. यात फुलांच्या आकाराचे नाजूक पेंडंट असते ज्यामध्ये चमकणारे क्युबिक झिरकोनिया स्टोन बसवलेले असतात.
स्टर्लिंग मंगळसूत्र हे मिनिमलिस्टिक असतात छोट्या पेंडंटसह साधी काळ्या मणीची साखळीत हे मंगळसूत्र असते.