Manasvi Choudhary
डेली वेअर ड्रेस पॅटर्न निवडताना मुली व महिला गोंधळतात, नेमके काय खरेदी करावे, कोणता पॅटर्न घ्यावा असा त्यांना प्रश्न पडतो.
डेली वेअर ड्रेस पॅटर्न तुम्हाला घ्यायचे असतील तर आज आम्ही तुम्हाला काही पॅटर्न दाखवणार आहोत.
नायरा कट पॅटर्न हा सध्या प्रचंड ट्रेडिंग पॅटर्न आहे. यामध्ये कुर्तीला कमरेच्या बाजूला कट असतात तिथे हलक्या चुण्या देखील असतात अत्यंत स्टायलिश असा ड्रेस पॅटर्न आहे.
आलिया कट पॅटर्न सध्या हा पॅटर्न खूपच ट्रेडिंग आहे. यामध्ये कुर्तीच्या वरच्या बाजूला छातीच्याजवळ V शेप डिझाईन असते आणि नंतर घेर असतो.
गुडघ्यापर्यंत सरळ कुर्ती आणि खाली अंंकल लेन्थ पॅंट ऑफिस किंवा फॉर्मलसाठी तुम्ही हा पॅटर्न निवडू शकता.
जीन्स किंवा लेगिंग्सवर सूट होतील अश्या शॉर्ट कुर्ती पॅटर्नचा सध्या ट्रेंड सुरू आहे. तुम्हीदेखील ही स्टाईल करू शकता.
काफ्तान कुर्ती हा अत्यंत सैल आणि आरामदायी पॅटर्न आहे याला बाजूने शिलाई नसते, तर बाह्या आणि कुर्ती एकत्रच जोडलेली असते.