Manasvi Choudhary
साडी किंवा ड्रेस एथनिक लूकवर केसांची अंबाडा स्टाईल नेहमीच आकर्षण ठरतो. पारंपारिक लूकमध्ये अनेक महिला व मुली खास अंबाडा स्टाईल करतात.
केसांच्या अंबाडा डिझाईन्सचे अनेक प्रकार आहेत. तुम्ही देखील अंबाडा हेअरस्टाईल घरीच करू शकता.
गॉसिमर फ्लोरल अंबाडा हा लग्नसमारंभासाठी प्रसिद्ध आहे. मेसी लूकमध्ये हा अंबाडा बांधला जातो. त्याभोवती तुम्ही साडीला मॅचिंग गजरा देखील माळू शकता.
स्लीक लो अंबाडा यामध्ये केसांना मधून किंवा कडेने भांग पाडून एकदम नीट मागे बांधले जाते. हा लूक अत्यंत प्रोफेशनल आणि मॉडर्न वाटतो.
ब्रेडेड अंबाडा यामध्ये केस जास्त वेळ व्यवस्थित ठेवायचे आहेत, त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. यात आधी केसांची वेणी घातली जाते आणि मग त्या वेणीचा गोल अंबाडा बनवला जातो.
फ्रेंच ट्विस्ट अंबाडा हा इंडो-वेस्टर्न प्रकार आहे. यात केसांना एका बाजूने ट्विस्ट करून वरच्या दिशेला पिन केले जाते. हा दिसायला अत्यंत स्टायलिश आणि 'युनिक' वाटतो.
जर तुमचे केस पातळ असतील, तर 'डोनट' वापरून केसांना मोठा आकार दिला जातो. सध्या या अंबाड्याला पूर्णपणे गजऱ्याने झाकण्याऐवजी, फक्त खालच्या बाजूने गजरा लावण्याचा ट्रेंड आहे.