Manasvi Choudhary
नवरात्री हा सण महिलांसाठी खास असतो. नऊ दिवसांच्या या सणउत्सवात महिला खास पारंपारिक पोशाख करतात.
नवरात्रीच्या नऊ दिवस महिला वेगवेगळ्या रंगाच्या साड्या घालतात. काही महिला खास चनिया चोली परिधान करतात.
तुम्हालाही साडी आणि चनिया- चोलीवर ब्लाऊज शिवायचे असेल तर तुम्ही लेटेस्ट 5 पॅटर्न ट्राय करा.
चनीया चोलीसाठी तुम्ही बॅकलेस दोरी ब्लाऊज शिवू शकता. हा पॅटर्न चनीया- चोलीसाठी कायमच ट्रेंडमध्ये असतो.
तुम्हाला जर अस्सल गुजराती स्टाईल ब्लाऊज पॅटर्न हवा असेल तर तुम्ही केडिया स्टाईल ब्लाऊज पॅटर्न निवडा. हा ब्लाऊज पॅटर्न नेहमीच्या ब्लाऊजपेक्षा लांब असतो कमरेला या ब्लाऊजच्या घेर असतो.
क्रॉप- टॉप आणि कोटी स्टाईल ब्लाऊज तुम्ही चनीया-चोलीसाठी निवडू शकता. या ब्लाऊजची क्रेझ कायमच असते. युनिक आणि स्टायलिश पॅटर्न साठी तुम्ही हे निवडू शकता.
ज्या महिलांना जास्त डीप गळा नको आहे त्यांनी व्हि नेक ब्लाऊज निवडा. हा पॅटर्न तुम्ही चनिया चोलीसाठी देखील शिवू शकता.
नवरात्रीच्या पारंपरिक लूकसाठी मिरर वर्क केलेले ब्लाऊज तुम्ही निवडू शकता जे स्टायलिश दिसतात.