Manasvi Choudhary
आगरी कोळी स्टाईल मंगळसूत्राची क्रेझ महिलांमध्ये कायम असते. सध्या लेटेस्ट ट्रेडिंगचे मंगळसूत्र डिझाईन्स आहेत.
पारंपारिक डिझाईन्स मंगळसूत्रामध्ये युनिक टच देऊन अनेक आगरी कोळी स्टाईल मंगळसूत्र डिझाईन्स केले आहेत.
आगरी-कोळी मंगळसूत्रात दोन वाट्यांचा आकार खूप मोठा आणि उठावदार असतो. या वाट्यांवर कोरीव नक्षीकाम किंवा फुलांची नक्षी असते.
जाड काळे मण्यांचे मंगळसूत्र या मंगळसूत्राची साखळी जाड असते आणि त्यात सोन्याचे मणी व काळे मणी यांचे सुंदर गुंफण असते.
डिझाइन्समध्ये केवळ काळे मणी नसून सोन्याची मोठी माळ आणि त्यात मध्यभागी कोळी स्टाईल पेन्डंट असते.
आगरी - कोळी स्टाईल दागिन्यांवर अनेकदा शंख, मासा किंवा शिंपल्यांचे नाजूक नक्षीकाम केलेले असते यामुळे हे मंगळसूत्र उठून दिसते.
अनेक महिला आता पोहे हार किंवा मणेरी साखळीला मोठे कोळी पेन्डंट जोडून नवीन डिझाईन बनवत आहेत.