Manasvi Choudhary
नवरीच्या सोळा श्रृगांरापैकी एक म्हणजे जोडवे. जोडवी हा केवळ दागिना नसून तो सौभाग्याचे प्रतीक आहे.
नव्या नवरीसाठी जोडवी डिझाईन्स तुम्ही फॅन्सी आणि स्टायलिश निवडू शकता.
आजकाल जड आणि जाड जोडव्यांपेक्षा नाजूक, ट्रेंडी आणि पायांच्या बोटांची शोभा वाढवणारी जोडवी डिझाईन्स ट्रेडिंगमध्ये आहेत.
फुलांची नक्षी असलेली जोडवी सध्या ट्रेंडमध्ये आहेत. जोडव्यावर वेलींची नाजूक नक्षी असते. हे डिझाइन दिसायला अतिशय नाजूक असते आणि साडी किंवा ड्रेस दोन्हीवर उठून दिसते.
जर तुम्हाला 'मिनिमलिस्टिक' लूक आवडत असेल, तर मधोमध एक चमकणारा पांढरा खडा किंवा अमेरिकन डायमंड असलेली जोडवी निवडा.
चांदीच्या जोडव्यांवर लाल किंवा हिरव्या रंगाचे 'मीनाकाम' वर्क केलेले असते.
यात एकाच जोडव्याला दोन किंवा तीन पदरी नाजूक साखळ्या जोडलेल्या असतात. काही डिझाईन्समध्ये दोन बोटांमधील जोडवी एकमेकांना साखळीने जोडलेली असतात.
जोडव्याच्या खालच्या बाजूला छोटे छोटे नाजूक घुंगरू असतात. चालताना होणारा मंद आवाजाचा नाद नवरीच्या पायांची शोभा वाढवतो.