Manasvi Choudhary
साडीमध्ये स्लिम आणि फिट दिसण्यासाठी केवळ साडी सुंदर असून चालत नाही तर ती नेसण्याची पद्धतही महत्वाची असते.
तुम्हालाही साडीमध्ये बारीक दिसायचे असल्यास ५ सोप्या ट्रिक्स फॉलो करा.
पारंपारिक सुती पेटीकोटमुळे कंबरेपाशी साडी फुगल्यासारखी दिसते. त्याऐवजी सध्या मिळणारे 'साडी शेपवेअर' पेटीकोट तुम्ही वापरू शकता.
साडीच्या निऱ्या पोटाच्या मध्यभागापासून थोड्या डाव्या बाजूला सरकवून खोचा. यामुळे पोटाचा भाग सपाट दिसतो आणि साडी फुगत नाही.
जर तुम्ही पदराची लांबी कमी ठेवली, तर तुमची उंची कमी आणि शरीर भरल्यासारखे वाटते.
जर तुम्हाला स्लिम दिसायचे असेल, तर कडक आणि जाड कापडाच्या साड्या निवडू नका जॉर्जेट, शिफॉन, क्रेप किंवा मऊ सिल्क अशा साड्या निवडा ज्या शरीराला नीट बसतात.
खूप मोठ्या फुलांचे प्रिंट्स किंवा खूप जाड बॉर्डर असलेल्या साड्यांमुळे तुम्ही अधिक जाड दिसू शकता. बारीक नक्षी किंवा नाजूक बॉर्डर असलेल्या साड्या निवडा.
साडीसोबत घातलेला ब्लाऊज नेहमी कोपरापर्यंत ठेवावा. यामुळे हातांचा जाडपणा झाकला जातो आणि पूर्ण लूक अधिक सुडौल आणि प्रोफेशनल वाटतो.