Shruti Vilas Kadam
रात्री उशिरा जेवण केल्यास अन्न नीट पचत नाही, त्यामुळे अपचन, गॅस आणि आम्लपित्ताचा त्रास वाढतो.
झोपण्याआधी खाल्लेले अन्न ऊर्जेत रूपांतर न होता चरबीच्या स्वरूपात साठते, त्यामुळे वजन वाढते.
पोट भरलेले असताना झोप लागण्यास अडचण येते आणि झोप वारंवार तुटते.
उशिरा जेवण केल्याने अॅसिड रिफ्लक्स वाढतो, ज्यामुळे छातीत जळजळ व घसा दुखणे होते.
विशेषतः मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये ब्लड शुगर नियंत्रणात राहत नाही.
दीर्घकाळ रात्री उशिरा जेवणाची सवय असल्यास हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो.
सकाळी उठल्यावर शरीर ताजेतवाने वाटत नाही आणि दिवसभर सुस्ती जाणवते.