Lasun Chivda : घरच्याघरी बनवा कुरकुरीत लसूण चिवडा

Ruchika Jadhav

हॉटेल स्टाइल लसूण चिवडा

लसूण चिवडा बनवणे फार सोप्प आहे. तुम्ही अगदी घरच्याघरी देखील हॉटेल स्टाइल लसूण चिवडा बनवू शकता.

Lasun Chivda | Saam TV

बेसण शेव आणि पापडी

लसूण चिवडा बनवण्यासाठी बेसण पिढाची पिवळी शेव आणि पापडी तळून घ्या.

Lasun Chivda | Saam TV

शेव आणि पापडी तळताना काळजी घ्या

शेव आणि पापडी तळताना ती करपनार नाही आणि कच्ची देखील राहणार नाही याची काळजी घ्या.

Lasun Chivda | Saam TV

लसूण सुकवून तेलात तळा

लसूण चिवडा असल्याने त्यामध्ये लसूण तर महत्वाचा आहे. त्यामुळे लसूण सुकवून तेलात तळून घ्या.

Lasun Chivda | Saam TV

कुरमुरे

लसूण चिवडामध्ये कुरमुरे नसतात मात्र तुमच्या आवडीनुसार तुम्ही यात सफेद कुरमुरे टाकू शकता.

Lasun Chivda | Saam TV

हळद, जिरे, मिरी आणि रामबंधू मसाला

तयार शेव आणि पापडी चुरून घेतल्यावर एका भांड्यात थोडेसे तेल घेऊन त्यात कडीपत्ता आणि हळद, जिरे, मिरी आणि रामबंधू चिवडा मसालाची फोडणी द्या.

Lasun Chivda | Saam TV

भाजलेली किंवा तळलेली डाळ

त्यानंतर शेव, पापडी आणि चण्याची भाजलेली किंवा तळलेली डाळ देखील यात टाकून घ्या.

Lasun Chivda | Saam TV

शेंगदाणे

तुम्ही या चिवड्यामध्ये शेंगदाणे सुद्धा टाकू शकता. याने चिवड्याला आणखी चव येते.

Lasun Chivda | Saam TV

काजू बदाम

जर तुम्ही शेंगदाणे आणि काजू तसेच बदाम खात असाल तर ते तेलामध्ये काहीसे भाजून घ्यावे. चिवडा जास्त काळ टिकवण्यासाठी प्रत्येक वस्तू भाजून किंवा तळून घ्यावी.

Lasun Chivda | Saam TV

Love Marriage Benefits: लव्ह मॅरेज करण्याचे फायदे माहितीयेत का?

Love Marriage Benefits | Saam TV