ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो.
असे मानले जाते की, श्रावण महिन्यात भगवान शंकराच्या केसातून निघणाऱ्या गंगेद्वारे पाऊस पृथ्वीवर येतो.
श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी कोणते उपाय केले पाहिजे, जाणून घ्या.
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही हा उपाय करु शकता.
श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी, एक भांडे पाणी आणि 3 बेलाची पाने घ्या.
बेलाच्या पानांवर चंदन लावा. तुमची इच्छा सांगून , बेलाची पाने एक एक करून अर्पण करा.
हा उपाय केल्यानंतर मागे वळून पाहू नका.