ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकालची बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे लठ्ठपणा ही समस्या सामान्य होत चालली आहे.
आज आम्ही तुम्हाला वॉकिंग करण्याची योग्य पद्धत सांगणार आहोत, जेणेकरुन तुम्ही सोप्या पद्धतीने वजन कमी करु शकता.
वॉकिंग करताना हळूहळू चालण्याची स्पीड वाढवा ज्यामुळे हार्ट रेट वाढेल आणि सामान्यपेक्षा जास्त गतीने कॅलरीज बर्न होतील.
चालताना हळूहळू स्पीड वाढवल्याने मसल्स टोन्ड होतात, आणि शरीरातील फॅट कमी होते.
वॉक करताना स्पीड बदलत राहा, यामुळे पोट आणि कंबरेचे स्नायू अॅक्टिव्ह होतात. यामुळे बेली फॅट लवकर कमी होण्यास मदत होते.
वॉक करताना शरीराला खाली वाकवू नका यामुळे शरीरावर ताण येतो आणि संतुलन बिघडते.
वॉक करण्याआधी जास्त पाणी पिऊ नये यामुळे पोटात तीव्र वेदना होऊ शकतात.