ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सूर्यग्रहण ही केवळ खगोलीय घटना नसून ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनाने देखील महत्वपूर्ण आहे. यावेळी कोणत्या गोष्टी करु नये, जाणून घ्या.
ग्रहणाच्या वेळी पचनक्रियेची गती मंदावते, यावेळी अन्नाचे सेवन केल्यास नकारात्मक उर्जेचा शरीरात प्रवेश होऊ शकतो.
ग्रहणाच्या वेळी कोणत्याही देवाची पूजा करु नये, अशावेळी मंदिराचे कपाट देखील बंद केले जाते.
सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये यामुळे डोळ्यांच्या दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. सूर्यग्रहण पाहण्यासाठी स्पेशल सोलार ग्लासचा वापर करा.
धार्मिक मान्यतेनुसार, ग्रहणाच्या वेळी झोपणे अशुद्ध मानले जाते. यामुळे शारीरिक आणि मानसिक उर्जेवर परिणाम होतो.
सूर्यग्रहणाच्या वेळी गरोदर महिलांनी घरातच रहावे.
सूर्यग्रहण समाप्त झाल्यानंतर अंघोळ करायला विसरु नका. यामुळे नकारात्मक उर्जा निघून जाते.