ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दरवर्षी १ ऑगस्ट रोजी जागतिक फुफ्फुस कर्करोग दिन साजरा केला जातो.
फुफ्फुसाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे कोणती, जाणून घ्या.
जर खोकला तीन आठवड्यांपेक्षा जास्त वेळ असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि डॉक्टरांशी संपर्क साधा.
कधीकधी खोकताना कफमध्ये रक्त येणे हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
जर तुम्हाला सतत सुस्त वाटत असेल किंवा कोणतेही काम न करता थकवा जाणवत असेल, तर हे देखील लंग कॅन्सरचे लक्षण असू शकते.
डाएटिंग न करता अचानक वजन कमी होणे किंवा पाठ आणि खांद्यात सतत वेदना होणे ही देखील लंग कॅन्सरचे लक्षणे असू शकतात.