Shruti Vilas Kadam
कीबोर्ड साफ करण्यापूर्वी लॅपटॉप पूर्णपणे Shut Down करा आणि चार्जर काढून टाका. यामुळे इलेक्ट्रॉनिक नुकसान होण्याचा धोका कमी होतो.
लॅपटॉप थोडा तिरका किंवा उलटा धरून हलकेच झटकावा. त्यामुळे कीजमध्ये अडकलेले धुळीचे कण आणि छोटे कण बाहेर पडण्यास मदत होते.
कीबोर्डवरील धूळ आणि डाग साफ करण्यासाठी कोरडे किंवा किंचित ओलसर मायक्रोफायबर कापड वापरा. कापड खूप ओले ठेवू नका.
सॉफ्ट-ब्रिसल ब्रशच्या मदतीने प्रत्येक कीच्या आजूबाजूची धूळ हळूवारपणे साफ करा. ब्रशने जास्त दबाव देणे टाळा.
कीजच्या फटीमध्ये अडकलेली धूळ काढण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्ससाठी योग्य compressed air वापरता येते. हवा एका कोनातून हलक्या दाबाने द्या.
कीबोर्डवर चिकट डाग असल्यास 70% isopropyl alcohol असलेल्या वाइपने कीज हलक्या हाताने पुसू शकता. द्रव थेट कीबोर्डवर ओतू नका.
कीबोर्ड साफ करताना पाणी, सॅनिटायझर किंवा कोणतेही लिक्विड थेट कीबोर्डवर स्प्रे करू नका. लिक्विड आत गेल्यास लॅपटॉपचे नुकसान होऊ शकते.