ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जर लॅपटॉप पावसात भिजला तर घाबरण्याऐवजी प्रथम या चुका अजिबात करु नका.
पावसात लॅपटॉप भिजल्यास लगेच ऑन करु नका. यामुळे शॉट सर्किट होऊ शकतो आणि लॅपटॉप खराब होऊ शकतो.
लॅपटॉप भिजल्यावर लॅपटॉप हलक्या हाताने पुसा. जोरजोरात पुसल्याने किंवा घासल्याने स्क्रीनचे नुकसान होऊ शकते.
लॅपटॉप भिजल्यावर अजिबात चार्जिंगला लावू नका यामुळे विजेचा झटका लागू शकतो.
काही लोक लॅपटॉप सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करतात यामुळे सर्किट जळण्याची शक्यता असते.
लॅपटॉप जास्त भिजल्यास स्वतः चालू करण्याचा प्रयत्न करु नका. सर्विस सेंटर किंवा एक्सपर्टची मदत घ्या.
लॅपटॉप भिजल्यास त्याला उलटा करा जेणेकरुन पाणी बाहेर येऊ शकेल. २४ ते ४८ तासांसाठी लॅपटॉप असाच ठेवा.