ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भातामध्ये शरीराला आवश्यक अनेक पोषक तत्व असतात.
डायबिटीजच्या रुग्णांना भात न खाण्याचा सल्ला दिला जातो. परंतु , खरंच भात खाल्ल्ययाने डायबिटीज होतो का, जाणून घ्या.
तज्ञ्जांच्या मते, भात खाल्ल्याने थेट डायबिटीज होत नाही. डायबिटीज हे आपल्या लाइफस्टाइल आणि जेनेटिक्सवर अवलंबून असते.
जेवल्यानंतर नेहमीच ब्लड शुगर लेव्हल वाढते , परंतु कोणत्या पदार्थांने ब्लड शुगर लेव्हल झपाट्याने वाढते, हे देखील तितकच महत्वाचे आहे.
प्रत्येक अन्नपदार्थाचे GI म्हणजेच ग्लायसेमिक इंडेक्स असतो. जर एखाद्या पदार्थाचे ग्लायसेमिक इंडेक्स ५५ पेक्षा जास्त असेल तर याला हाय ग्लायसेमिक इंडेक्स म्हणतात.
तज्ञ्जांच्या मते, भाताचा इंडेक्स हा तांदळाच्या जातीवर अवलंबून आहे. ब्राउन राइस आणि पारबॉइल्ड राइसचा GI कमी असतो.
जर तुम्ही फक्त भात खात नसून डाळ किंवा भाजीसोबत भात खात असाल तर यामुळे भाताचा GI कमी होतो.