ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लॅपटॉप हा दैनंदिन कामासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. योग्य काळजी घेतल्यास लॅपटॉपचे आयुष्य वाढते. लॅपटॉपची काळजी कशी घ्यावी ते जाणून घ्या.
लॅपटॉपची स्क्रीन आणि कीबोर्ड नियमित स्वच्छ ठेवावे. लॅपटॉप पुसण्यासाठी मऊ कापड किंवा ड्राय ब्रशचा वापर करा.
लॅपटॉप नेहमी सपाट आणि कडक पृष्ठभागावर ठेवून त्याचा वापर करावा.
लॅपटॉप जास्त गरम होऊन देऊ नका. नेहमीच लॅपटॉप हवेशीर जागेत वापरावा. तसेच लॅपटॉप थेट पंख्याखाली किंवा एसीमध्ये वापरणे टाळावे.
लॅपटॉप नेहमी 40 ते 80 टक्के चार्ज करावा. सतत चार्जरला लावून ठेवू नका बॅटरी लवकर खराब होण्याची शक्यता असते.
लॅपटॉपला ओरिजिनल चार्जर आणि केबल वापरावी. दुसरा किंवा खराब चार्जरमुळे लॅपटॉपला नुकसान होऊ शकते.
लॅपटॉपचे सॉफ्टवेअर आणि ऑपरेटिंग सिस्टम नियमित अपडेट करत जा. तसेच लॅपटॉपच्या सुरक्षितेसाठी चांगले अँटीव्हायरस लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल करून घ्यावे.