ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नेल पॉलिश लावण्याची आवड प्रत्येकालाच असते. नेल पॉलिश बाजारातून खरेदी करत नसाल तर, तुम्ही घरीसुध्दा नेल पॉलिश बनवू शकता.
अनेकदा लिपस्टिक तुटली जाते. मग ती पुन्हा जोडण्यास कठीण होते.
पण तुम्ही तुटलेल्या लिपस्टिकचा वापर करुन नेल पॉलिश बनवू शकता. जाणून घ्या
एका वाटीमध्ये लिपस्टिक घ्या आणि तीला चांगली मॅश करुन घ्या. लिपस्टिकला हलके गरम करुनसुध्दा मॅश करु शकता.
आता वितळवून घेतलेल्या मॅश लिपस्टिकमध्ये नेल पॉलिश किंवा बेस कोट मिक्स करा. तुमच्या पध्दतीनुसार तुम्ही हे मिश्रण हवे तितके जाड करु शकता.
दोन्ही कलर जोपर्यंत मिक्स होत नाही तोपर्यंत दोन्ही गोष्टी मिक्स करत राहावे.
जर तुम्हाला नेल पॉलिशचा वेगळा रंग हवा असेल तर, तुम्ही दुसरा नेल पेंट कलर मिक्स करु शकता.
मिश्रण चांगल्या पध्दतीने मिक्स होईल तेव्हा नेल पॉलिश एका बॉटलमध्ये भरुन ठेवा.
जेव्हा पण नेल पॉलिश लावायची असेल तेव्हा आधी बेस कोट लावा आणि मग नेल पॉलिश लावावी. तुमच्या हातांना परफेक्ट लुक येईल.