Priya More
मध्य प्रदेशमध्ये राहणारा तरुण सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या नावाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.
१८ वर्षीय ललित पाटीदारने प्रति चौरस सेंटीमीटर २०१.७२ केसांसह सर्वात जास्त केसाळ पुरूषाचा चेहरा असल्याचा रेकॉर्ड केला आहे.
मध्य प्रदेशच्या रतलाम जिल्ह्यातील नांदलेटा गावात ललित पाटीदार कुटुंबासोबत राहतो.
ललित पाटीदारच्या चेहऱ्यावर दाट केस आहेत. त्याला वेअरवुल्फ सिंड्रोम नावाच्या दुर्मिळ आजार झाला आहे.
जगात फक्त ५० लोक या आजाराने ग्रस्त आहेत. कारण हा एक अत्यंत दुर्मिळ आजार आहे.
जन्मजात आजाराच्या काळात ललित पाटीदारला आतापर्यंत आयुष्यात अनेक चांगले आणि वाईट अनुभव आले आहे.
लहानपणापासूनच ललितचे तोंड पाहून सर्वजण घाबरायचे. मुलं त्याच्यासोबत खेळायची नाहीत.
काही लोकांनी त्याला बाल हनुमान समजून स्वीकारले तर काहींनी त्याच्यावर दगडफेकही केली.
ललित गावातीलच सरकारी शाळेत बारावीत शिकत आहे. तो एक चांगला खेळाडू आहे. त्याचे स्वत:चे यूट्यूब चॅनेल आहे.
ललितच्या कुटुंबात त्याचे आईवडील आणि चार बहिणी आहेत. तो त्याचा एकुलता एक भाऊ आहे.