Dhule Tourism : थंडीत अजूनही ट्रेकिंगला गेला नाहीत? मग 'हे' ठिकाण तुमच्यासाठी ठरेल खास

Shreya Maskar

धुळे

लळिंग किल्ला महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात मुंबई-आग्रा महामार्गाजवळ डोंगरावर वसलेला एक प्राचीन आणि ऐतिहासिक किल्ला आहे. सुट्टीत येथे नक्की भेट द्या.

fort | google

लळिंग किल्ला

लळिंग किल्ला एकेकाळी खान्देशातील एक महत्त्वाचा गड होता. हा किल्ला फारूकी, मराठा आणि मुघल राजवटीत महत्त्वाचा होता आणि त्याच्या पायथ्याशी लळिंग नावाचे गाव आहे.

fort | google

आजूबाजूचा परिसर

लळिंग किल्ल्यावर एक मोठे तळे आणि अनेक पाण्याची टाकी आहेत. जी किल्ल्याच्या माचीवर आणि आजूबाजूला आढळतात. या गोष्टी ऐतिहासिक आणि संरक्षणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या होत्या.

fort | yandex

किल्ला कोणी बांधला?

लळिंग किल्ला फारुकी राजवटीत, विशेषतः मलिक राजा फारुकी यांच्या काळात बांधला गेला. त्याचे बांधकाम १४ व्या शतकाच्या उत्तरार्धात झाले, असे मानले जाते.

fort | google

हेमाडपंती मंदिरे

लळिंग किल्ल्यावर दोन हेमाडपंती मंदिरे आणि एक हेमाडपंती विहीर आहे. किल्ल्यावर ललितामाता मंदिर आणि अनेक दगडी पाण्याच्या टाक्याही आहेत.

fort | google

उद्देश काय?

लळिंग किल्ला हा सुरत-बुरहानपूर या प्राचीन व्यापारी मार्गावर असल्याने तो लष्करी आणि व्यापारी दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा होता, कारण तो व्यापार आणि सैनिकी हालचालींसाठी एक सुरक्षित तळ म्हणून काम करत होता.

fort | google

ट्रेकिंग

लळिंग किल्ला ट्रेकिंगसाठी साधे-सोपे ठिकाण आहे.नवशिक्यांसाठी तसेच अनुभवी ट्रेकर्ससाठी सोयीस्कर आहे.

trekking | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

trekking | yandex

NEXT : फुल टू धमाल! 'गोव्यातील' Hidden पिकनिक स्पॉट, वीकेंड होईल खास

Goa Tourism | yandex
येथे क्लिक करा...