Shreya Maskar
रोजच्या धावपळीतून निवांत वेळ हवा असेल तर वीकेंडला गोवा ट्रिप प्लान करा. तुम्हाला येथे भन्नाट वेळ घालवता येईल. गोव्याच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल.
अंजुना बीच गोव्यातील एक अत्यंत प्रसिद्ध आणि लोकप्रिय किनारा आहे, जो त्याच्या हिप्पी संस्कृती पाहायला मिळते. त्यामुळे येणारा वीकेंड येथे नक्की प्लान करा.
अंजुना बीच गोव्यातील नाईटलाइफसाठी उत्तम ठिकाण आहे. कारण तिथे बीच , पार्ट्या आणि DJचे वातावरण पाहायला मिळते. येथे तुम्ही नाचू शकता, समुद्राच्या काठी निवांत वेळ घालवू शकता.
अंजुना बीचच्या आजूबाजूला अनेक हॉटेल्स, गेस्ट हाऊस आणि रिसॉर्ट्स आहेत. जे बजेट-फ्रेंडलीपासून लक्झरीपर्यंतचे पर्याय देतात. तसेच शॉपिंगचे सुंदर मार्केट देखील आहे.
अंजुना बीचवर पॅरासेलिंग, जेट स्की, बनाना राईड, बंपर राईड, स्कूबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंग यांसारख्या अनेक प्रकारच्या वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता येतो. हे ठिकाण साहसी जलक्रीडाप्रेमींसाठी बेस्ट आहे.
अंजुना बीचवरून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. त्यामुळे तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट करू शकता.
अंजुना बीचवर नारळाची झाडे, मऊ वाळू आणि खडकाळ किनारे पाहायला मिळतात, ज्यामुळे तो गोव्यातील एक खास समुद्रकिनारा ठरतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.