Fort In Dhule : शिखरावरून दिसते खानदेशाचे विहंगम दृश्य, धुळे येथे लपलाय 'हा' ऐतिहासिक किल्ला

Shreya Maskar

धुळे

लळिंग किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील धुळे शहराच्या दक्षिणेस केवळ ८-१० किमी अंतरावर, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाजवळ (NH3) वसलेला एक प्राचीन आणि ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे.

Dhule | google

खानदेश

१३ व्या शतकात फारुकी राजांनी बांधलेला हा किल्ला खानदेश प्रदेशातील एक महत्त्वाचे लष्करी आणि प्रशासकीय केंद्र होता.

Khandesh | google

खानदेशाची राजधानी

लळिंग किल्ला हा मध्ययुगीन काळात, विशेषतः फारुकी राजवटीच्या सुरुवातीच्या काळात खानदेशाची राजधानी होता. मध्ययुगीन काळातील एक ऐतिहासिक बालेकिल्ला म्हणून लळिंग किल्ला प्रसिद्ध आहे.

Capital of Khandesh | google

लळिंग किल्ला सद्यस्थिती

लळिंग किल्ला सध्या पडझड झालेल्या अवस्थेत आहे. प्रवेशद्वारे, बुरुज खडकात कोरलेल्या पाण्याच्या टाक्यांचे अवशेष पाहायला मिळतात.

Laling Fort | google

ट्रेकिंग

लालिंग किल्ला धुळे शहराचे विहंगम दृश्य, पावसाळ्यातील आव्हानात्मक ट्रेकिंग, प्राचीन हेमाडपंथी मंदिरे आणि खडकात कोरलेल्या पाण्याच्या टाक्यांसाठी ओळखला जातो.

Trekking | google

मंदिरे

लळिंग किल्ल्याच्या पायथ्याशी हेमाडपंती महादेवाचे मंदिर आणि गडावर ललितमाता मंदिर असून, ते पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहेत. येथे तुम्हाला शांती अनुभवता येते.

Temples | google

इतिहास

लळिंग किल्ल्यावर प्रामुख्याने १४३७ मध्ये बहामनी सुलतान आणि खानदेशचे फारुखी राजे (नसीर खान) यांच्यात लढाई झाली होती.

History | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

disclaimer | google

NEXT : धुक्याची चादर अन् थंडगार वातावरण; उन्हाळ्यात पर्यटकांना खुणावते कोकणातील 'मिनी महाबळेश्वर'

Konkan Tourism | saam tv
येथे क्लिक करा...