Manasvi Choudhary
लक्ष्मीपूजेसाठी लाल रंगावर पांढऱ्या रंगाच्या रांगोळीने लक्ष्मीची पाऊले काढा मध्यभागी पावलांचे ठसे काढा.
कमळ हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. दोन पावलांच्या ठोशांच्या मागे तुम्ही कमळाची डिझाईन काढा. खुप सुंदर रांगोळी दिसेल.
घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूंना फुलांची रांगोळी आणि बाजूला पावलांची रांगोळी काढा.
दोन्ही बाजूंना दिवे आणि मध्यभागी पावलांची रांगोळी काढा. विविध रंगानी काढलेली ही रांगोळी खुप सुंदर दिसते.
दाराच्या समोर स्वास्तिक आणि पावलांची रांगोळी काढा. दारामध्ये ही रांगोळी अधिक सुंदर दिसते.
गोल रांगोळी काढून त्यात पावलांची रांगोळी काढा. फुलांची ही रांगोळी अत्यंत सुंदर आणि आकर्षक दिसते.