ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठमोळी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर ही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
ज्ञानदाने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ज्ञानदाचा निरागस स्वभाव हा सर्वांनाच आवडतो.
ज्ञानदाची ठिपक्यांची रांगोळी ही मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेत ती अप्पू ही भूमिका साकारत होती.
ज्ञानदा सध्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत काम केले आहे.
ज्ञानदा ही मूळची सांगळीची आहे. ती सध्या पुण्यात असते.
ज्ञानदाने P.E.S मॉडर्न गर्ल्स हाय स्कूलमधून शिक्षण घेतले.
यानंतर तिने मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्समधून कॉमर्स विषयात पदवी प्राप्त केली.
ज्ञानदाने कॉलेजपासूनच अभिनयाला सुरुवात केली होती. तिने अनेक नाटकांमध्येही काम केले होते.