Manasvi Choudhary
'लग्नानंतर होईलच प्रेम' ही स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका आहे.
सध्या ही मालिका चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेतील पात्र देखील प्रेक्षकांची मने जिंकत आहे.
या मालिकेत कश्मिरा कुलकर्णी ही खलनायिकेच्या भूमिकेत दिसतेय.
कश्मिराने या देखील विविध मालिकांमध्ये अभिनय सादर केला आहे. तिने चार दिवस सासूचे, काव्यांजली, श्री गुरूदेव दत्त या मालिकांमध्ये अभिनय केलाय.
हिंदीसह साऊथ मध्येही कश्मिराने अभिनयाची छाप पाडली आहे.
सोशल मीडियावर कश्मिरा तितकीच सक्रिय असलेली पाहायला मिळते.
कश्मिराचे हे गुलाबी साडीतील फोटो सध्या लक्ष वेधून घेत आहेत.
कश्मिराच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.