Shreya Maskar
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' महाराष्ट्रात राबवली जात आहे.
या योजने अंतर्गत महिलांना दरमहिना १५०० रुपये दिले जातात.
महिला या पैशांची गुंतवणूक मोठ्या प्रमाणात म्युच्युअल फंडमध्ये करत आहेत.
म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवल्याने फायदा तर होतो, पण त्यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याआधी एक्सपर्टची मदत घ्या.
म्युच्युअल फंडमध्ये किमान दोन वेगळ्या फंडांमध्ये गुंतवणूक करा, एकाच योजनेत गुंतवणूक करणे टाळा.
एकाच म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास पैशांची जोखीम अधिक वाढते.
योग्य फंड हाऊसेची निवड करा.
सुरुवातीला म्युच्युअल फंड शिकत असाल तर कमी रक्कमेची गुंतवणूक करा.
म्युच्युअल फंडमुळे योग्य पद्धतीने पैशांची वाढ होते.