Ankush Dhavre
महाराष्ट्र राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली आहे.
या योजनेंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत.
लाडक्या बहिणींना प्रश्न पडलाय की, जानेवारी महिन्याचा हप्ता केव्हा येणार?
आता महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जानेवारीच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट दिली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारीचा हप्ता २६ जानेवारीपर्यंत येईल.
आदिती तटकरे यांनीही माध्यमांशी बोलताना, जानेवारीचा हप्त्याबाबत मोठी अपडेट दिली आहे.
जानेवारीचा हप्ता हा २६ जानेवारीपर्यंत येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
या महिन्यातही १५०० चा हप्ता येणार आहे.