Shreya Maskar
'लाडकी बहीण योजना' अंतर्गत पात्र महिलांना दर महिना १ हजार ५०० रुपये सरकारकडून दिले जातात.
अनेक महिला ही छोटी रक्कम समजून घर खर्चासाठी वापरून टाकतात.
मात्र 'थेंबे थेंबे तळे साचे' या म्हणीनुसार तुमची आजची छोटी गुंतवणूक भविष्यात मोठा फायदा देईल.
तुम्ही या योजनेच्या रक्कमेतून योग्य गुंतवणूक करून पैशांचा आकडा वाढवू शकता.
कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आवर्जून एक्स्पर्टचा सल्ला घ्या.
या पैशातून तुम्ही छोटा घरगुती व्यवसाय सुरू करू शकता.
सर्वात महत्त्वाचे तुम्ही दर महिना या पैशांची गुंतवणूक केल्यास आपत्कालीन परिस्थितीत तुम्हाला या पैशाची मदत होईल.
तुम्ही हे पैसे टप्प्याने गुंतवून भविष्यात स्वतःचे वाहन घेऊ शकता.