Manasvi Choudhary
महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होणार.
लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा? हे थोडक्यात जाणून घेऊ.
लाभार्थी माहिलांना १ जुलै ते १५ जुलैपर्यंत कधीही तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. महा इ-सेवा केंद्रावर तसेच मोबाईल अॅप. सेतू सुविधा केंद्रावर अर्ज करता येईल.
महिलेचे संपूर्ण नाव तसेच लग्नाचे नाव आणि लग्नानंतरचे बदलले नाव लिहा.
जन्मदिनांक, अर्जदाराचा घरचा संपूर्ण पत्ता तसेच जन्माचे ठिकाण संपूर्ण माहिती द्या.
जन्माचे ठिकाण, जिल्हा, गाव आणि शहर पिनकोड यासह मोबाईल आणि आधार नंबर लिहा.
जर तुम्ही शासनाच्या इतर आर्थिक योजनेचा लाभ घेत असाल तर ती माहिती भरा. जसे की, संजय गांधी निराधार योजना
अर्जदाराने बँकेची संपूर्ण माहिती बँकेचे नाव , खाते धारकाचे नाव, खाते क्रमांक, IFSC कोड लिहायचे आहे.तुमचा आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे की नाही ते तपासून योग्य पर्याय निवडा.
अर्ज कोठे जमा करणार आहे तो पर्याय निवडा. लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे सोबत ठेवा.