Manasvi Choudhary
महाराष्ट्र सरकारची महिलांसाठी लाडकी बहीण योजना आहे.
या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येकी १५०० रूपये मिळतात.
आतापर्यंत ११ महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात आले आहेत.
सध्या महिला एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत.
अशातच काही महिलांना आता लाडक्या बहिणींचे पैसे मिळणार नाहीत.
नवीन निकषानुसार ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्था महिलांकडे चारचाकी वाहन नसावे.
लाभार्थी महिला महाराष्ट्राची असणे आवश्यक आहे.