Heart Attack Risk: कमी झोपेमुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो का?

Manasvi Choudhary

उशिरा झोपण्याची सवय

आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे, ताणतणाव, मोबाईल अतिवापरामुळे रात्री उशिरा झोपण्याची सवय अनेकांना असते.

Heart Attack Risk

हृदयाच्या आरोग्याचे नुकसान

झोप पूर्ण झाली नाही केवळ थकवा येत नाही तर हृदयाच्या आरोग्याचेही नुकसान होते. मात्र अपऱ्या झोपेमुळे आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या उद्भवतात.

Heart Attack Risk

रक्तदाब वाढू शकतो

जेव्हा तुम्ही गाढ झोपेत असता तेव्हा शरीराचा रक्तदाब आणि हृदयाची गती कमी होते आणि हृदयाला आराम मिळतो मात्र अपुरी झोप झाली की तर रक्तदाब वाढण्याची शक्यता असते ज्यामुळे हृदयावर अतिरिक्त ताण येतो आणि हाय ब्लड प्रेशरची समस्या निर्माण होते.

Risk of heart attack | pinterest

रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलवर परिणाम

झोपेच्या कमतरतेमुळे शरीराच्या पचनक्रियेवर परिणाम होतो यामुळे शरीरात 'बॅड कोलेस्ट्रॉल' आणि रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते.

blood sugar | GOOGLE

छातीत जळजळ वाढते

झोप पूर्ण झाली नाही तर छातीत जळजळ होण्याचे प्रमाण वाढते. ही जळजळ रक्तवाहिन्यांचे नुकसान करते ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

Chest Pain | pinterest

ताणतणाव वाढतो

पुरेशी झोप न मिळाल्यामुळे शरीरातील ताणतणावाची पातळी वाढते, ज्यामुळे हृदयावर ताण येतो. हृदयाचे आजार होतात.

Stress | pinterest

किती झोप घेणे आवश्यक?

हृदयाच्या निरोगी आरोग्यासाठी नियमितपणे ७ ते ८ तासांची झोप घेणे आवश्यक आहे.

Sleep Time | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Canva

NEXT: लठ्ठपणा आणि मधुमेह कमी करण्यासाठी करा घरगुती सोपे उपाय

Obesity And Diabetes Health Care Tips
येथे क्लिक करा..