Siddhi Hande
स्ट्रीट फूड खायला सर्वांनाच आवडतात. त्यात मोमोज तर सध्या सर्वांना आवडतात.
यामध्ये स्टीम मोमोज आणि फ्राइज मोमोज ऑप्शन असतो. त्यापैकी फ्राइड मोमोज खायला खवय्यांना खूप आवडते.
तुम्ही कधी कुरकुरे मोमोज खाल्ले का, हे मोमोज खूप चविष्ट लागतात.
मैदा, मीठ, तेल, कोबी, गाजर, लसूण, आलं, मिरी पावडर, कॉर्न फ्लेक्स, कॉर्न फ्लोअर पेस्ट
सर्वात आधी तुम्हाला पीठ मळून घ्यायचे आहे.सर्वात आधी मैद्यात थोडं तेल टाका. त्यात पाणी टाकून मऊ पीठ मळून घ्या.
यानंतर पॅनमध्ये कोबी, गाजर अशा भाज्या परतून घ्या. त्यात आलं-लसुणदेखील परतून घ्या.यामध्ये तुम्ही मसाले टाका.
यानंतर पिठाच्या लहान पुऱ्या लाटून घ्या. त्यात सारण भरुन मोमोजचा आकार द्या.
यानंतर कॉर्न फ्लोअरच्या पेस्टमध्ये बुडवून घ्या. त्यानंतर कॉर्न फ्लेक्समध्ये घोळवून घ्या.
यानंतर गरम तेलात मोमोज सोनेरी ब्राउन होईपर्यंत तळून घ्या.