Shreya Maskar
ऑफिसवरून आल्यावर 5 मिनिटांत कुरकुरे चाट बनवा.
कुरकुरे चाट बनवण्यासाठी कुरकुरे, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, दही, चाट मसाला, लाल तिखट, जिरे पूड, कोथिंबीर, लिंबू आणि शेव इत्यादी साहित्य लागते.
एका मोठ्या बाऊलमध्ये तुमचे आवडते कुरकुरे एकत्र मिक्स करून घ्या.
यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची टाका.
त्यानंतर मिश्रणात दही, चाट मसाला, लाल तिखट आणि जिरे पूड घालून चांगले मिक्स करा.
यात चवीनुसार मीठ टाकून लिंबाचा रस पिळा.
शेवटी यात आवडीनुसार गोड किंवा तिखट चटणी टाका.
तुम्ही कुरकुरे चाटमध्ये शेव आणि चीज देखील टाकू शकता.