Kombadgad : महाराष्ट्रातील 'कोंबडगड' पाहिलात का? ट्रेकिंगसाठी सर्वात बेस्ट

Shreya Maskar

कुंजरगड किल्ला

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्यात कुंजरगड किल्ला आहे. हा एक डोंगरी किल्ला आहे.

Fort | google

माळशेज

कुंजरगड किल्ला माळशेज घाटाच्या पश्चिमेला बालाघाट रांगेमध्ये आहे. येथून निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.

Fort | google

पाण्याची टाकी

कुंजरगड किल्ल्यावर कातळकोरीव पाण्याची टाकीचे अवशेष आहेत. गडावर चढताना किंवा माथ्यावर फिरताना या टाक्या पाहायला मिळतात.

Fort | google

इतर नावे

कुंजरगड किल्ल्याला 'कोंबडगड' आणि 'हत्तीगड' असे म्हणतात. ही नावे गडाच्या आकारावरून पडली आहेत.

Fort | google

नावांचा इतिहास

'कुंजर' या संस्कृत शब्दाचा अर्थ हत्ती असा होतो. गडाचा आकार हत्तीसारखा दिसतो, म्हणून याला 'हत्तीगड' म्हणतात. गडावर पहाटे कोंबडा आरवतो अशी एक आख्यायिका आहे. म्हणून याला 'कोंबडगड' असेही म्हटले जाते.

Fort | google

ट्रेकिंग स्पॉट

कुंजरगड किल्ला ट्रेकिंगसाठी एक उत्तम पर्याय आहे. हिवाळ्यात येथे आवर्जून जा. कुंजरगड किल्ल्यावरून आजूबाजूच्या प्रदेशाचे विहंगम दृश्य दिसते.

Fort | google

नैसर्गिक गुहा

कुंजरगड हा हरिश्चंद्रगडाच्या पूर्वेला असलेला एक टेहळणीचा किल्ला आहे. कुंजरगडाच्या उजवीकडील डोंगरावर तीन नैसर्गिक गुहा आहेत.

Fort | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Fort | google

NEXT : वीकेंडला फिरायला परफेक्ट डेस्टिनेशन, डहाणू ट्रेन पकडा अन् थेट पोहचा 'या' लोकेशनला

Palghar Tourism | SAAM TV
येथे क्लिक करा...