Dhanshri Shintre
नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात, कळसूबाई पर्वतरांगेच्या पश्चिम भागात ऐतिहासिक आणि दुर्गारोहकांमध्ये लोकप्रिय असा कुलंग किल्ला स्थित आहे.
अलंग आणि मदनगडासह हे किल्ले दुर्गत्रिकूट म्हणून परिचित आहेत आणि अत्यंत कठीण ट्रेकिंग मार्गासाठी ओळखले जातात.
हा किल्ला नाशिक-कल्याणच्या प्राचीन व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी उभारला गेला असून त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे.
समुद्रसपाटीपासून जवळपास ४,८२५ फूट उंचीवर उभा असलेला हा किल्ला पर्वतरांगांमध्ये वसलेला एक भक्कम गिरीदुर्ग मानला जातो.
१६७० च्या आसपास मराठा पेशवा मोरोपंत यांनी हा किल्ला जिंकला असल्याचे उल्लेख आहे. मराठा साम्राज्यात या किल्ल्याला मोठे सैनिकी आणि धोरणात्मक महत्त्व होते.
कुलंग किल्ला कठीण आणि आव्हानात्मक ट्रेकिंग मार्गासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे अनुभवी ट्रेकर्ससाठी हा किल्ला साहस आणि थ्रिलने भरलेला अनुभव देतो.
अलंग, मदन आणि कुलंग मिळून तयार झालेले दुर्गत्रिकूट प्रसिद्ध आहे. यापैकी कुलंगगडावर पदमार्गाने पोहोचता येते, तर अलंग मादनसाठी रॉक क्लायंबिंग कौशल्य आवश्यक आहे.
किल्ल्यावर कातळात कोरलेल्या गुंफा, दगडी पायऱ्या आणि पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात. येथून कळसूबाई शिखरासह आसपासचा परिसर नेत्रदीपक आणि भव्य दिसतो.
मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून इगतपुरीकडे जाताना किंवा मुंबई–नाशिक रेल्वे मार्गाचा वापर करून ट्रेकच्या पायथ्यावरील गावांपर्यंत सहज पोहोचता येते.